IT Career – केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे
” केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ।। ” हे समर्थ रामदासांचे वचन करीयरच्या दृष्टीने फारच महत्वपूर्ण आहे. करीयर घडवण्यासाठी साठी आधी प्रयत्न करणे हा रुढार्थ. माझ्या मते त्यात आणखी एक अर्थ दडलेला आहे आणि तो म्हणजे कार्य करा (Do), नुसती पोपटपंची नको. कोणतेही कार्य यशस्वीपणे तडीस नेता येण्यासाठी त्याबद्दलची माहिती(Knowledge) आणि त्या माहितीचा समस्या सोडविण्यासाठी उपयोग करून दाखविण्याचे कौशल्य( Skill/ Doing ) आत्मसात करणे गरजेचे आहे. उदाहरणादाखल एखादी जावा (Java)सारखी प्रसिद्ध प्रोग्रामिंगची भाषा घेऊ. ‘ जावा प्रोग्रामिंग ‘ मध्ये नोकरी मिळण्यासाठी ‘जावा’ ही भाषा वापरून प्रोग्राम लिहिता येणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरीसाठीच्या मुलाखतीआधी पाठांतर करणाऱ्यांनी कितीही हुशारीने ‘जावा’ बद्दलच्या अवगत माहितीचे प्रदर्शन केले तरीही प्रोग्राम लिहायला सांगितल्यावर अशा वाक् पंडितांची भंबेरी उडणे स्वाभाविक आहे. विद्यापीठामधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारे बहुतांशी नवीन उमेदवार अशा प्रकारचे ‘वाक् पंडित ‘ असतील तर औद्योगिक क्षेत्रात काम तरी कोण करणार !
सध्या “instant” गोष्टींचा जमाना आहे. कुणालाही मागे वळून पाहायला वेळ नाही. प्रत्येकजण करीयर आणि त्या अनुषंगाने येणारा पैसा या साठी जमेल तो “short-cut” घ्यायला तयार आहेत. व्यायामशाळेत जाऊन मेहनत करून शरीर कमवण्यापेक्षा जीवनसत्वांचा(vitamins) किंवा जमल्यास उत्तेजक द्रव्यांचा वापर (भडिमार ?) करून जिंकणे महत्वाचे ठरू पाहत आहे. अशा परिस्थितीत करीयर संबंधी “short-cut” न वापरणे खरच कितपत शक्य आहे?
इच्छा असेल तर असे करणे अजिबात कठीण नाही. आपल्याकडे पदवीसाठीचे अभ्यासक्रम ३ किंवा ४ वर्षांचे असतात. हे अभ्यासक्रम विषयाची सखोल माहिती होण्याच्या उद्देशाने तयार केले जातात, परंतु औद्योगिक क्षेत्र आणि टेक्नोलॉजी यांच्या विकासाची गती जास्त असल्यामुळे काही वर्षानंतर औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आणि अभ्यासक्रमात अंतर्भूत कौशल्ये यात तफावत निर्माण होते. ही तफावत बहुतेक वेळेला कार्य कौशल्याची असते आणि ही तफावत कौशल्यावर आधारित शिक्षणाने कमी करता येणे सहज शक्य आहे.
आपल्या पदवीसाठीच्या विहित अभ्यासक्रमात असलेया विषयाची सखोल माहिती करून घेताना [ उदा. डेटाबेस ], त्याच्या बरोबरीने नोकरीसाठी उपयुक्त कार्य कौशल्ये [ SQL आणि PL-SQL] आत्मसात केली तर नोकरी मिळवणे आणि उत्तरोत्तर प्रगती करणे सोपे जाईल. खालील तक्त्यात अभ्यासक्रमात असलेले विषय आणि त्याच्या बरोबरीने येणारी तांत्रिक कार्य कौशल्ये दिली आहेत. अभ्यासक्रमाबरोबरच तांत्रिक आणि वर्तणूक कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवणे नोकरीच्यादृष्टीने महत्वाचे ठरते. अशाप्रकारे नोकरीसाठीआवश्यक कौशल्ये पदवीबरोबरच आत्मसात केली तर अनेक फायदे आहेत. पदवीनंतर नोकरी मिळण्यासाठी उशीर लागणार नाही. त्याबरोबर येणारा ताण आणि पैसे दोन्ही वाचतील. आणि पदवी घेतल्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेस साठी आणखी पैसे आणि वेळ खर्च करण्याचे कारणच राहणार नाही.
तांत्रिक कौशल्ये [Information Technology Skills]
Subject >Graduation:- BE(IT), BE(CS) BCS, MCM, MCS, BCA [IT related graduations]
Database:- Oracle, SQL Server, SQL, PL-SQL
Operating System:- Unix, shell scripting
Software Quality Assurance:- Software Testing techniques, process and tools
Software Engineering:- Unified modelling language(UML), UML tool
Before Final year Project:-
Full Stack Dev
Web technologies: HTML5, CSS, Java script, Angular/React
Java, Servlet- JSP, Spring MVC, Spring Boot
C# and ASP.NET MVC
वर्तणूक कौशल्ये [Soft skills]
BE(IT), BE(CS) BCS, MCM, MCS, BCA [IT related graduations]
Behavioral Skills
First year:– English Language
Second year:- English Language, Communication and Presentation
Third year:- Quantitative Aptitude, Personality development